हुंडईने 17 जानेवारीला आपल्या सर्वाधिक प्रतीक्षित असलेल्या हुंडई क्रेटा EV लाँच केली आहे. आता कंपनी पुढील काही वर्षांत आणखी तीन नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स सादर करण्याच्या तयारीत आहे.
भारतीय बाजारात सतत वाढत असलेल्या मागणीचा विचार करून हुंडई इंडिया आपला EV पोर्टफोलियो विस्तारत आहे. याच धर्तीवर, कंपनीने 17 जानेवारीला ऑटो एक्सपो 2025 मध्ये हुंडई क्रेटा EV लाँच केली आहे. आता कंपनी येत्या काही वर्षांत आणखी तीन नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स लाँच करण्याचा मानस आहे.
कंपनीची योजना काय आहे?
हुंडई क्रेटा EV लाँचच्या वेळी हुंडई इंडियाचे COO तरुण गर्ग यांनी सांगितले की, “कंपनी आणखी तीन मास-मार्केट EVs लाँच करणार आहे, जे भारतात स्थानिक स्तरावर तयार केले जातील.” मात्र, गर्ग यांनी मॉडेल्स आणि त्यांच्या अचूक लाँच टाइमलाइनसारख्या तपशीलांची माहिती उघड करण्यास टाळाटाळ केली.
हुंडई इंस्टर EV
हुंडई 2026 च्या मध्यापर्यंत हुंडई इंस्टर बेस्ड EV सादर करू शकते, जी पंच EV ला टक्कर देऊ शकते. ग्लोबल मार्केटमध्ये ही कार 42kWh आणि 49kWh अशा दोन बॅटरी पॅकसोबत उपलब्ध आहे. इंस्टरची ड्रायव्हिंग रेंज 355 किमीपर्यंत आहे. इंस्टर EV ची एक्स-शोरूम किंमत अंदाजे 12 लाख रुपयेपासून सुरू होऊ शकते.
वेन्यू आणि ग्रँड i10 EV
दुसरीकडे, हुंडई भारतीय बाजारात वेन्यू आणि ग्रँड i10 निओस चे ऑल-इलेक्ट्रिक व्हर्जन देखील लाँच करणार आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोन्ही कार्स 2027 पर्यंत EV व्हर्जनमध्ये सादर केल्या जातील. हुंडई ग्रँड i10 निओस ही ब्रँडची एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक कार असू शकते.